ladki bahin yojana: आदिती तटकरे यांनी दिली माहिती ; डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा 

ladki bahin yojana: विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने थेट मतदारांवर परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहीण योजना तात्पुरती थांबली आहे, आणि त्यामुळे योजना बंद होणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली. पण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार
ladki bahin yojana आदिती तटकरे यांनी ट्विट केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे! ही योजना जुलै 2024 पासून लागू झाली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे पैसे पात्र भगिनींच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले आहेत. तसेच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती आहे.ladki bahin yojana

निवडणूक आयोगाने सर्व विभागांना सूचित केले आहे की मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजना त्वरित थांबवाव्यात. महिला आणि बालकल्याण विभागातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देण्यात येत असल्याने योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. आयोगाला विभागाने सांगितले की निधी वितरण चार दिवसांपूर्वी थांबवले आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment

Viral Tips Online