केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना एकत्र मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. या दोन्ही योजनांसाठी लाभार्थ्यांची एकच यादी आहे.
12,000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी
ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहतील.
12,000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीएम किसान योजना – शेतकऱ्यांसाठी निश्चीत उत्पन्न
पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू आहे. यात प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे आधार जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा होतात. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यातील 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांना 17 हप्त्यांमध्ये 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
12,000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी महासन्मान योजना
महाराष्ट्रात 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर हप्त्यात पीएम किसान योजनेसोबत लाभ मिळतो. 2023-24 आणि 2024-25 या वर्षांमध्ये 91.45 लाख शेतकरी कुटुंबांना 6,949.68 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, गावपातळीवरील विशेष मोहिमांमुळे 20 लाख शेतकरी पीएम किसान योजनेत नोंद झाले आहेत.
12,000 रुपयांच्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभाचे थेट हस्तांतरण
पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्यादरम्यान 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 1,900 कोटी रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 2,000 कोटी रुपये थेट जमा होतील. यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी एकत्र मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातील.
या समारंभात सहभागी होण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in लिंकवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.