6 व्या हप्त्याचे 1500 बँक खात्यात होणार जमा लाडकी बहीण योजनेचे

Aaditi Tatkare Ladaki Bahin विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यावर सरकारी कामांवर नियंत्रण येते. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना थांबवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधी थांबवला आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. आता ही योजना बंद होणार का, यावर चर्चा सुरू असताना, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची घोषणा केली आहे.

Aaditi Tatkare Ladaki Bahin १९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर या योजनेबाबत बंद होणार असल्याची अफवा पसरली. त्यानंतर अदिती तटकरे यांनी लगेचच स्पष्टपणे पोस्ट करत सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.” तटकरे म्हणाल्या, “या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांचा लाभ आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे, तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान देण्यात आला आहे.”

सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार

Aaditi Tatkare Ladaki Bahin अदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की, “सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबरमध्ये दिला जाईल. या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.”

Aaditi Tatkare Ladaki Bahin राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत महिलांना आश्वासन दिले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.”

Leave a Comment

Viral Tips Online