Ladki Bahin Yojana Big News:महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना, जी अनेक महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रसिद्ध होती, आता बंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या योजनेला तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो महिलांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. या लेखात आपण पाहणार आहोत की हा निर्णय का घेतला गेला, पुढील हप्ता कधी मिळेल, आणि योजना पुन्हा कधी सुरू होईल याची संपूर्ण माहिती.
लाडकी बहीण योजना:
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते. आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते मिळाले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे आता पुढील हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झाला नाही.
लाडकी बहीण योजना बंद करण्यामागचे कारण;
राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, ज्या मतदारांवर प्रभाव टाकू शकतात, त्यांना तातडीने थांबविण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
10 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे!
महायुती सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते जमा केले आहेत. मात्र, 10 लाख महिलांना वेळेअभावी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. महिला आणि बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिलांना निवडणूक पूर्ण झाल्यानंतरच हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते कधी मिळणार?
अनेक महिलांना आता प्रश्न पडला आहे की ही योजना कायमस्वरूपी बंद झाली का. मात्र असे काही नाही. सरकारने आधीच 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा केले आहेत. उर्वरित महिलांना तांत्रिक अडचणी आणि वेळेअभावी पैसे मिळालेले नाहीत. विधानसभा निवडणूक पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील आणि ही योजना पुन्हा सुरू होईल.
लाडकी बहीण योजना अजूनही महिला आणि बाल विकास विभागाच्या नजरेखाली आहे. निवडणुका संपल्यानंतर ही योजना पूर्ववत सुरू केली जाईल आणि महिलांना त्यांचे आर्थिक लाभ मिळत राहतील.