या महिलांच्या 6 व्या हप्त्याचे बँक खात्यात होणार जमा 1500; ladki bahin yojana form

ladki bahin yojana form Aaditi Tatkare विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सरकारी कामांवर मर्यादा येतात. या काळात मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना थांबवाव्यात, असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, महिला आणि बाल विकास विभागाने या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. यापूर्वी, राज्य सरकारने या योजनेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. आता योजना बंद होईल अशी चर्चा सुरू असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर काल (19 ऑक्टोबर) या योजनेबाबत बंद होईल अशी अफवा पसरली होती. यानंतर सरकारने ताबडतोब त्यावर स्पष्टीकरण दिले.

अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील” असे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांचे पैसे आधीच जमा केले आहेत. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना दिला आहे.”

सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळणार

“सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात दिला जाईल. या योजनेबद्दल कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये,” असे अदिती तटकरे पुढे म्हणाल्या.

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरे यांची पोस्ट शेअर करून या योजनेबाबत मोठे विधान केले. “राज्यातील महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने सांगतो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींनी विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे अजित पवार यांनी एक्सवर लिहिले आहे.

Leave a Comment

Viral Tips Online