Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus :लाडक्या बहिणींच्या खात्यात 5500 रुपये दिवाळी बोनस जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे पैसे मिळाले आहेत? चला त्याबद्दल जाणून घेऊया…
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : जुलै २०२४ पासून महाराष्ट्रात ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जात आहेत. राज्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळत आहे.
परंतु, नुकतीच सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली की सरकार योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना मोबाईल गिफ्ट म्हणून देणार आहे, पण ही बातमी खोटी आहे. सरकारकडून अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे, सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच योजनेची माहिती तपासून घ्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. खरी आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी नेहमी अधिकृत स्रोतांचा अवलंब करा.