नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण “Pik vima 2024” अंतर्गत अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम कधी येणार ते जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची रक्कम उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. काही दिवसांपासून सर्व शेतकऱ्यांना Pik vima 2024 अंतर्गत विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये. यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती असलेली नवीन यादी तयार करण्यात आली आहे.
अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे, त्यामुळे रक्कम मिळण्यास विलंब होत नाही. Pik vima 2024 योजनेतून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची सरकारने काळजी घेतली आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार भरपाई?
शेतकरी मित्रांनो, या योजनेत नांदेड, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, धाराशिव, लातूर, कोल्हापूर, बीड, सांगली, जालना, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, रत्नागिरी या 24 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. उद्यापासून या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.
शेतकरी मित्रांनो, आपल्याला या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.